डॉ.उल्हास पाटील धर्मदाय रुग्णालयात श्रीं ची स्थापना

जळगाव -लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  गोदावरी फाऊंडेशन संचलित डॉ.उल्हास पाटील धर्मदाय रुग्णालयात आज मंगळवार दिनांक १९ सप्टेंबर रोजी गोदावरी फाऊंडेशनच्या सदस्या डॉ.केतकी पाटील व डीएम कार्डिओलॉजिस्ट डॉ.वैभव पाटील यांच्या शुभहस्ते श्रीं ची स्थापना झाली.

 

याप्रसंगी गणपती बाप्पा सर्वांना सुखी ठेव, दु:ख दूर कर, निरोगी आरोग्य प्रदान कर अशी प्रार्थनाही करण्यात आली. रुग्णांनी देखील गणपती बाप्पाचा आशिर्वाद घेऊन गणेशोत्सवात सहभाग नोंदविला.

 

दरवर्षाप्रमाणे यंदाही डॉ.उल्हास पाटील धर्मदाय रुग्णालयात नर्सिंग ऑफिसच्या समोर आज गणपतीची स्थापना करण्यात आली. याप्रसंगी गोदावरी फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ.उल्हास पाटील व सचिव डॉ.वर्षा पाटील यांच्यासह चिमुकल्या किवा व सारा पाटील यांची विशेष उपस्थीती होती. सुंदर, आकर्षक सजावट करण्यात आली. याप्रसंगी विधीवतपणे श्री गणेशाचे पूजन व महाआरती डॉ.पाटील दांम्पत्यांच्याहस्ते करण्यात आली. या संपूर्ण कार्यक्रमाप्रसंगी रुग्णांनी देखील पुजेत सहभाग घेतला. या उत्सवाच्या कालावधीत आरोग्याच्या तक्रारींमुळे हॉस्पिटलमध्ये अ‍ॅडमिट आहोत, पण येथील या बाप्पाच्या उत्सवामुळे आम्हाला आनंद झाला असून गणपती बाप्पा सर्वांना सुखी ठेवो अशी प्रार्थनाही यावेळी रुग्णांनी केली तसेच डॉ.उल्हास पाटील यांच्यासह कुटूंबियांचे येथील सेवा व सुविधेबद्दल आभारही मानले. याप्रसंगी नर्सिंग ऑफिसचे संकेत पाटील, चिन्मय शुक्‍ला, किर्ती पाटील, आकाश धनगर यांच्यासह रुग्णालयात अहोरात्र सेवा देणारा नर्सिंग स्टाफसह निवासी डॉक्टरांची उपस्थीती होती.

Protected Content