भुसावळ लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । सीबीएसई बोर्डाच्या दहावी आणि बारावीच्या निकालात डॉ. उल्हास पाटील इंग्लिश मीडियम सीबीएसई स्कूल, भुसावळने उत्कृष्ट यश संपादन केले आहे. विद्यार्थ्यांच्या या शानदार कामगिरीमुळे शाळेचे नाव उज्ज्वल झाले आहे.
दहावीचा निकाल:
दहावीच्या परीक्षेत ध्रुव सुनील अहिरराव याने ९७% गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला. भावी हेमंत इंगळे ९६.८०% गुणांसह द्वितीय, तर स्नेहल जोशी ९४.८०% गुणांसह तृतीय क्रमांकावर राहिली. खुशी तायडे (९४.६०%), रूतूजा पाटील (९४.४०%) आणि हर्षल पाटील (९४.२०%) यांनी अनुक्रमे चौथा, पाचवा आणि सहावा क्रमांक मिळवला. याशिवाय, समृद्धी तायडे (९३.४०%), अदिश्री सोनकुसारे आणि आदित्यकुमार सुमन (प्रत्येकी ९३.२०%) यांनी अनुक्रमे सातवा, आठवा आणि नववा क्रमांक पटकावला. अभिषेक भोलाणे ९२.८०% गुणांसह दहाव्या क्रमांकावर राहिला. विशेष म्हणजे, ध्रुव अहिरराव याने गणितात १०० पैकी १०० गुण मिळवले, तर भावी इंगळे, हर्षल पाटील आणि अदिश्री सोनकुसारे यांनी आयटी विषयात १०० पैकी १०० गुण मिळवून शाळेचा नावलौकिक वाढवला.
बारावीचा निकाल:
बारावीच्या परीक्षेत ओजस्वीत सायवान आणि अमित अहिरराव यांनी प्रत्येकी ९४.४०% गुण मिळवून प्रथम क्रमांक विभागून घेतला. प्रणीता पैकराव ९४.२०% गुणांसह तृतीय, तर इशांत यादव ९०.४०% आणि आदित्य तोताणी ८९% गुण मिळवून अनुक्रमे चौथा आणि पाचव्या क्रमांकावर आले.
विद्यार्थ्यांच्या या नेत्रदीपक यशाबद्दल आदरणीय गोदावरी आजी, संस्थेचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील, उपाध्यक्ष सुभाष पाटील, सचिव डॉ. वर्षा पाटील, गोदावरी फाउंडेशनचे सदस्य डॉ. केतकी पाटील, हृदयरोग तज्ञ डॉ. वैभव पाटील, डॉ. अनिकेत पाटील, डॉ. अक्षता पाटील आणि शाळेच्या मुख्याध्यापिका अनघा पाटील व सर्व शिक्षकांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे. विद्यार्थ्यांच्या या उज्ज्वल भविष्यासाठी त्यांनी शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत.