सावदा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | सावदा येथील डॉ. उल्हास पाटील इंग्लिश मीडियम सीबीएससी स्कूल माध्यमिक शालांत परीक्षा इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांनी निकालाची उज्ज्वल परंपरा कायम ठेवली आहे. विज्ञान विभागातून तुषार हेमंत देशमुख ९२.४० टक्के, श्रीपाद नारद ९०.८० टक्के, रोशनी कुकरेजा ८९.२० टक्के, वाणिज्य विभागातून प्रथमेश लोहार ८०.२० टक्के गुण प्राप्त केले. या सर्व विद्यार्थ्यांचे गोदावरी समूहाचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील, डॉ.वर्षा पाटील, डॉ. केतकी पाटील आणि शाळेच्या प्राचार्या भारती महाजन यांनी या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.
सावदा येथील डॉ. उल्हास पाटील इंग्लिश स्कूलच्या इयत्ता दहावीच्या निकालात विद्यार्थिनीच हुश्श्यार ठरल्या आहेत. सर्व विद्यार्थिनींनी ९० टक्केपेक्षा अधिक गुण मिळवून शाळेचा नावलौकिक वाढविला आहे. त्या विद्यार्थिनींची नावेखालील प्रमाणे१.तन्मयी स्वप्नीलकुमार लासूरकर ९७.२० टक्के, ज्ञानेश्वरी हेमंत नेमाडे ९६.६ टक्के, धारा नितीन भिरूड ९३.४ टक्के, आर्या सुदर्शन कानडे ९३.२ टक्के, अनुष्का किशोर नेमाडे ९१.८ टक्के असे गुण प्राप्त केले. या सर्व यशस्वी विद्यार्थीनिंचे गोदावरी समूहाचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील, डॉ. वर्षा पाटील, डॉ. केतकी पाटील, शाळेच्या प्राचार्या भारती महाजन यांनी कौतुक केले आहे.
डॉ. उल्हास पाटील सीबीएसई स्कूलच्या निकालाची उज्ज्वल परंपरा कायम
8 months ago
No Comments