जुलैच्या अखेरपर्यंत बारावी व दहावीचे निकाल- शिक्षणमंत्री

मुंबई प्रतिनिधी । १५ जुलैपर्यंत बारावीचा तर जुलै महिन्याच्या अखेरपर्यंत दहावीच्या परिक्षेचे निकाल जाहीर करण्यात येणार असल्याची महत्वपूर्ण माहिती शालेय शिक्षण मंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी दिली. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्या बोलत होत्या.

राज्य सरकारने विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून पुढील महिन्यापासून शैक्षणिक वर्ष सुरू करण्याची तयारी सुरू केली आहे. यातच दहावी व बारावीच्या परिक्षांचे निकाल नेमके केव्हा लागणार याबाबत उत्सुकता लागलेली आहे. या पार्श्‍वभूमिवर एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत शालेय शिक्षण मंत्री ना. वर्षा गायकवाड यांनी सांगितलं की, पेपर अडकून पडले असल्याने यावर्षी आपला निकाल उशीर येतोय. १५ जुलैपर्यंत बारावीचा आणि जुलै महिन्याच्या अखेपर्यंत दहावीचा निकाल जाहीर करण्याचा आमचा प्रयत्न आहे. जेणेकरुन ऑगस्टमध्ये प्रवेश प्रक्रिया पूर्ण होऊन सप्टेंबरपासून अकरावीचे वर्ग सुरु करता येतील. त्यादृष्टीने आम्ही जास्त मेहनत करत आहोत. लवकरात लवकर करता येईल या यासाठीही प्रयत्न सुरु आहेत.

Protected Content