डॉ. रेड्डीज लॅबोरेटरी कोरोना औषधी मोफत वाटणार

नवी दिल्ली वृत्तसंस्था । आतापर्यंत करोनाला रोखण्यासाठी अनेक कंपन्यांनी औषधे बाजारात आणली आहेत. अशातच देशातील डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीजने बुधवारी करोना व्हायरसवरील औषध बाजारात आणत असल्याची घोषणा केली.

गरजूंना ते मोफत उपलब्ध करून दिले जाणार आहे. डॉ.रेड्डीजने अविगन (फेविपिराविर) टॅबलेट बाजारात आणणार असल्याचे जाहीर केले. हे औषध करोनाच्या सौम्य आणि सामान्य संसर्गासाठी वापरता येईल असे कंपनीने म्हटले आहे.

या कंपनीने शेअर बाजाराला पाठवलेल्याय एका माहितीत म्हटले आहे की, फुजीफिल्म टोयामा केमिकल कंपनी लिमिटेडसोबत झालेल्या जागतिक लायसन्स करारानुसार डॉ. रेड्डीजने अविगन (फेविपिराविर) २०० मिलीग्रॅमची गोळी भारतात निर्मिीत, विक्री आणि वितरण करण्याचा विशेष अधिकार मिळाला आहे.

डॉ.रेड्डीजच्या या औषधाला भारताच्या डीसीजीआयने करोना रुग्णांसाठी वापरण्याची परवानगी दिली आहे, असे सीईओ एम व्ही रमन्ना यांनी सांगितले. आमच्यासाठी उच्च गुणवत्ता, उत्तम क्षमता आणि विश्वसनियता याला सर्वात आधी प्राधान्य आहे. आमच्या मते अविगन (फेविपिराविर) भारतात करोना झालेल्या रुग्णांसाठी प्रभावी ठरेल असे, रमन्ना म्हणाले.

डॉ. रेड्डीजने हे औषध देशातील ४२ शहरात मोफत होम डिलिव्हरी सेवा देणार असल्याचे म्हटले आहे. यासाठी कंपनीने १८००-२६७-०८१० ही हेल्पलाइन नंबर आणि www.readytofightcovid.in हे वेबसाइट सुरू केली आहे. या ठिकाणी सकाळी ९ ते रात्री ९ वाजेपर्यंत औषधांची ऑर्डर देता येते. ही सेवा सोमवार ते शनिवार या दिवसात मिळणार आहे.

भारतात याआधी MSN ग्रुप, सिप्ला, हेटेरो, ग्लेनमार्क, सन फार्मा, जेनवर्क्ट फार्मा या कंपन्यांनी करोना रुग्णांसाठी औषध बाजारात आणली आहेत. या औषधांच्या किमती ३३ ते ७५ रुपये एक टॅबलेट अशी आहे. गेल्याच आठवड्यात MSN ग्रुपने फेविलो नावाची सर्वात स्वस्त गोळी बाजारात आणली होती. सन फार्माने बाजारात आणलेल्या औषधाची किमत ३५ रुपये इतकी आहे.

Protected Content