डॉ. पी. आर. उपर्वट पालि अँड बुद्धिझमच्या परीक्षेत उत्तीर्ण

खामगाव -लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | येथील टिळक राष्ट्रीय विद्यालयातून सेवानिवृत्त झालेले मुख्याध्यापक डॉ. पी. आर. उपर्वट हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठांतर्गत येत असलेल्या मिलिंद कला महाविद्यालय, औरंगाबाद येथून पालि अँड बुद्धिझम एम. ए. च्या परीक्षेत प्रावीण्य श्रेणीत उत्तीर्ण झाले असून त्यांनी ८९.३ % गुण मिळविलेले आहेत.

त्यांचा एम. ए. चा निकाल डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने दिनांक १९ आगस्ट रोजी जाहीर केला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेला संदेश , ‘ मनुष्य हा आजन्म विद्यार्थी असतो ‘ या संदेशानुसार डॉ. उपर्वट सेवानिवृत्त झाल्यानंतर एम. ए. करिता प्रवेश घेतला व स्वतः अध्ययन व अध्यापनाचे कार्य करीत प्रावीण्य श्रेणीत उत्तीर्ण झाले. डॉ. उपर्वट हे यापूर्वीच इंग्रजी विषयात एम ए असून शारीरिक शिक्षण विषयात पीएचडी आहेत. त्यांनी आपल्या यशाचे श्रेय पालि प्रचारक प्रा. डॉ. एस.एम. सोनोने, प्रा. डॉ. भदंत सत्यपाल, प्रा. डॉ. भदंत यशकश्यपायन, पत्नी कल्पना उपर्वट यांना दिले आहे. डॉ. उपर्वट हे सध्या ऑनलाईन योगा, एम. ए., नेट, सेट चे वर्ग मोफत घेत आहेत. त्यांच्या या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

 

 

Protected Content