पाचोरा तालुक्यात सर्रास अवैध गावठी दारू विक्री

पाचोरा -लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | तालुक्यातील श्री क्षेत्र नंदिकेश्वर महाराज मंदिर असलेल्या गावात तसेच बिल्दी, हडसन, दुसखेडा, वडगाव, वेरूळी या परिसरातील गावांमध्ये स्थानिक नागरिक अवैधरित्या विषारी गावठी दारू विक्री करत असून, या गावठी दारू विक्रेत्यांमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत आहे.

या गावठी दारू विक्री विरुद्ध गावातील नागरिकांनी वेळोवेळी आवाज उठवल्यावर सदर अवैध दारु विक्रेत्यांकडून कुठलीही कारवाई झाली नसून यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात यावी. सदर अवैध गावठी दारू विक्रेत्यांवर मागील काही काळात राज्य उत्पादन शुल्क व पाचोरा पोलिसांच्या वतीने कारवाई देखील करण्यात आली होती. त्या कारवाईला ही न जुमानता अवैध दारू विक्री सर्रास पणे सुरू आहे. मागील काही काळामध्ये या विषारी दारुमुळे अनेकांना जीव देखील गमवावा लागला असून त्यांचा संसार व परिवार उघड्यावर आला आहे. स्थानिक प्रशासनाने यांचेवर कठोर कारवाई करून अवैध गावठी दारू विक्री कायम स्वरूपी बंद करावी अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून करण्यात येत आहे.

Protected Content