जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष, माजी खासदार डॉ. उल्हास पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त डॉ. उल्हास पाटील रुग्णालयाच्या हभप जगन्नाथ महाराज अंजाळेकर नेत्रालयात ७५ रुग्णांवर मोतीबिंदूची शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली, ज्यामुळे त्यांना नवी दृष्टी मिळाली आहे. याचदरम्यान फाउंडेशनच्या सचिव डॉ. वर्षा पाटील यांनी शस्त्रक्रिया झालेल्या सर्व रुग्णांशी संवाद साधला, ज्यामुळे एक भावनिक क्षण निर्माण झाला होता.
डॉ. उल्हास पाटील यांचा वाढदिवस दरवर्षी समाजोपयोगी उपक्रमांनी साजरा केला जातो. यंदाही त्यांच्या वाढदिवसानिमित्त शस्त्रक्रिया अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे. या अभियानांतर्गत सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया मोफत केल्या जातात. यात डॉ. उल्हास पाटील रुग्णालयातील नेत्रविभाग नेहमीच अग्रेसर असतो.
डॉ. उल्हास पाटील रुग्णालयाच्या हभप जगन्नाथ महाराज अंजाळेकर नेत्रालयाचे प्रमुख डॉ. एन.एस. आर्विकर यांच्या मार्गदर्शनाखाली नेत्ररोग तज्ञ डॉ. नि.तु. पाटील यांनी ७५ रुग्णांवर मोतीबिंदूची फेको पद्धतीची आधुनिक शस्त्रक्रिया केली. या शस्त्रक्रियेमुळे खान्देशसह विदर्भातील नेत्ररुग्णांना नवी दृष्टी मिळाली आहे.
शस्त्रक्रियेनंतर सर्व ७५ नेत्ररुग्णांनी डॉ. उल्हास पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव केला. तसेच यावेळी संस्थेच्या सचिव डॉ. वर्षा पाटील यांच्याशी रुग्णांनी साधलेला संवाद अतिशय भावनिक ठरला. रुग्णांनी डॉ. उल्हास पाटील यांच्याबद्दल शब्दरूपी कौतुक केले. डॉ. वर्षा पाटील यांनी रुग्णांना शस्त्रक्रियेनंतरची काळजी कशी घ्यावी याबाबत माहिती दिली.
या कार्यक्रमात वैद्यकीय महाविद्यालयाचे संचालक डॉ. एन.एस. आर्विकर, डीन डॉ. प्रशांत सोळंके, वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रेमचंद पंडित, डॉ. नि.तु. पाटील, डॉ. रेणूका पाटील, डॉ. मयुरी निलावाड, डॉ. अंजली मयेकर, डॉ. शिफा मिर्झा, डॉ. आशुतोष गिरबीडे, डॉ. दर्शन कुकीयन, डॉ. यश पाटील, डॉ. जतीन बाविस्कर, डॉ. पल्लवी घुळे, डॉ. उर्मी आदी उपस्थित होते.