डॉ. कुंदन फेगडे यांचा कोळी समाज आंदोलनास पाठींबा

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | येथील ख्यातनाम वैद्यकीय व्यावसायिक तथा सामाजिक कार्यकर्ते डॉ. कुंदन फेगडे यांनी जळगाव येथे सुरू असलेल्या कोळी समाजाच्या आंदोलनास पाठींबा दिला आहे.

जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव येथे १० ऑक्टोंबर पासून समाजाला अनुसुचीत जमातीचे प्रमाणपत्र व जातवैधता आदिवासी कोळी प्रमाणपत्र मिळावे यासाठी समाजा मार्फत अन्नत्याग आंदोलन सुरु असुन या आंदोलनास सर्व पातळीवरून नागरीकांचा मोठा पाठींबा मिळत आहे. दरम्यान, यावलचे समाजसेवक तथा आश्रय फाउंडेशनचे अध्यक्ष आणी माजी नगरसेवक डॉ कुंदन फेगडे यांनी देखील या आंदोलनास आपला पाठींबा दिला आहे.

जिल्ह्यासह राज्यातील अनेक ठीकाणी वास्तव्यास असलेल्या कोळी समाजाला आदिवासी कोळी समाजाला अनुसूचित जमाती प्रमाणपत्र आणि जात वैधता प्रमाणपत्र मिळण्याबाबत अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यावर कायमस्वरूपी उपाय योजण्या साठी रास्त मागण्यासाठी सदर सत्याग्रह सुरु आहे. या आंदोलनास डॉ. कुंदन फेगडे यांनी भेट देऊन कोळी समाज बांधवांच्या समस्या व मागण्या जाणून घेत समाजाला न्याय मिळावा यासाठी अन्नत्याग आंदोलनात सहभागी जगन्नाथ बाविस्कर,संजय कांडेलकर, नितिन सपकाळे,नितिन कांडेलकर, पुंडलीक सोनवणे,पद्दमाकर कोळी यांच्यासह कोळी समाज बांधवांशी संवाद साधला. तसेच कोळीबांधवांच्या आंदोलनास आश्रय फाऊंडेशन यावलच्या वतीने डॉ कुंदन फेगडे यांनी आपला जाहीर पाठींबा दिला आहे.

दरम्यान, या प्रसंगी काही उपोषणास सहभागी कार्यकर्ते अत्यवस्थ झाले त्यांच्या तब्येती ची आस्थेने विचारपूस डॉ कुंदन फेगडे यांनी केली. देशातील प्रत्येक समाजाला त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे धोरण असून राज्यातील सर्व समाजांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील असल्याबाबत आमचे नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व आपल्या जळगाव जिल्ह्याचे नेते ना . गिरीष महाजन यांनी सांगितले आहे त्यामुळे कोळी समाजाला लवकरच न्याय मिळेलअशी अपेक्षा डॉ. कुंदन फेगडे यांनी याप्रसंगी व्यक्त केली.

Protected Content