धरणगाव-अविनाश बाविस्कर ।डॉ. हेडगेवार नगर ग्रामपंचायतीची निवडणूक जाहीर करण्यात आली असून निवडणूकीत १० सदस्यांची निवड करण्यात येणार आहे. यात सरपंचपदी विकास पॅनलच्या सविता धनराज सोनवणे तर सदस्यपदी शितल महेंद्र पवार यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. उर्वरित ८ जागांसाठी ही निवडणूक घेण्यात येत आहे. त्यातच ८ पैकी विकास पॅनलच्या तीन सदस्यांना प्रतिस्पर्धी उमेदवारांनी जाहीर पाठींबा दिल्यामुळे विकास पॅनलचे १० पैकी ५ जागा निश्चित झाल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, वैभव लक्ष्मी नगर मधील हनुमान मंदीरात विकास पॅनलच्या प्रचाराचा नारळ फोडण्यात आला.
धरणगाव शहरापासून जवळ असलेल्या डॉ. हेडगेवार नगरला ग्रामपंचातीची मंजूरी देण्यात आली आहे. त्यामुळे डॉ. हेडगेवार नगर ग्रामपंचायतीची पहिल्यांदा निवडणूक घेण्यात येत आहे. यात तीन प्रभागातून सरपंच आणि इतर ९ सदस्य असे एकुण १० सदस्य निवडून देण्याचे आहे. यात सरपंचपदी विकास पॅनल गटाच्या सविता धनराज सोनवणे आणि सदस्यपदी शितल महेंद्र पवार यांची निवड करण्यात आली आहे. दरम्यान आता उर्वरित आठ जागांसाठी निवडणूक घेण्यात येत आहे.
विकास पॅनलचे उमेदवार देशमाने शिला अनिल (अनु.जाती महिला), मंगलाबाई परशूराम महाजन (सर्वसाधारण महिला), शाम भिमराव पाटील (सर्वसाधारण), चंदन दिलीपराव पाटील (नामाप्र), स्वाती मंदार चौधरी (सर्वसाधारण महिला), संभाजी शंकरराव सोनवणे (सर्वसाधारण), जिजाबाई मांगो पाटील (सर्वसाधारण महिला) आणि चंदन किशोर चौधरी (सर्वसाधारण) असे आठ निवडणूकीच्या रिंगणात आहेत.
तीन प्रतिस्पर्धी उमेदवारांनी दिला जाहीर पाठींबा
विकास पॅनलचे उमेदवार चंदन पाटील यांना प्रतिस्पर्धी मोहित प्रकाश पाटील यांनी, मंगलाबाई महाजन यांना प्रतिस्पर्धी रेखा दत्तात्रय पाटील आणि श्याम भिमराव पाटील यांना प्रतिस्पधी उमेदवार हेमंत रामदास महाजन अश्या तीन जणांनी जाहीर पाठींबा दिला आहे. त्यामुळे विकास पॅनलचे निवडणूकीपुर्वीच १० पैकी ५ सदस्यांची निवड निश्चित झाल्याचे पहायला मिळत आहे.