डॉ. कुंदन फेगडे यांच्या प्रयत्नाने “देवाभाऊ की पाठशाला” उपक्रमाला सुरूवात

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून समाजसेवक व आश्रय फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. कुंदन फेगडे यांच्या माध्यमातुन शिक्षणाचे पर्व, देवाभाऊ सेवा पर्व अंतर्गत “देवाभाऊ की पाठशाला” हा उपक्रम रावेर-यावल तालुक्यातील जनजातीय क्षेत्रात राबविला जात आहे. परिसरातील स्थलांतरित शेत मजूर, विटा भट्टी कामगार, गवळी तसेच सर्व जनजाती बांधवांचे लहान मुले शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून देवाभाऊ की पाठशाळा हा उपक्रम सुरु करण्यात आला आहे. शिक्षणाची गोडी निर्माण व्हावी म्हणून प्रवासी शिक्षकांच्या माध्यमातून विद्यार्थ्याना शिकविण्याचा एक छोटासा प्रयत्न सुरु आहे.

सदर प्रकल्पाची पाहणी डॉ. कुंदनं फेगडे यांनी केली. यावेळी आवश्यकतेनुसार विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व उपयोगी वस्तूंचे वाटप केले व त्यांचातील शिक्षणासाठीचा लळा मनोमन सुखावून गेला. त्यांचा सोबत संवाद साधत असतांना डॉ फेगडे म्हणाले भारताचे भविष्य उज्वल होते आहे याची जाणीव हा प्रकल्प पाहिल्यावर होते आहे. मायबाप जनतेच्या हितासाठी झटण्याची ऊर्मी अश्या ठिकाणाहूनच मिळत असते अश्याच पद्धतीने मतदार संघातील अधीकाधीक विद्यार्थ्यांवर संस्कार व्हावा. यासाठी आपल्या सगळ्यांना पुढच्या काळात प्रचंड काम करावे लागणार आहे असा आशावाद त्यांचा माध्यमातुन व्यक्त केला यावेळी त्यांचासोबत पंकज महाजन, महेश गडे, राम शिंदे आदि उपस्थित होते.

Protected Content