फैजपूर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | भारतीय संविधानाचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३४ वी जयंती फैजपूर शहरात मोठ्या उत्साहात आणि अभिमानाने साजरी करण्यात आली. शैक्षणिक, प्रशासकीय, सामाजिक, राजकीय तसेच खासगी संस्थांच्या वतीने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. फैजपूर शहरातून भव्य मिरवणुका, मोटारसायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले. या माध्यमातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा प्रचार व प्रसार करण्यात आला. त्यांच्या कार्याचा गौरव करत अनेक मान्यवरांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी आमदार अमोल हरिभाऊ जावळे, केतकी पाटील, माजी नगराध्यक्ष पिंटू राणे, माजी उपनगराध्यक्ष शेख कुर्बान, नितीन राणे, भरत महाजन, सिद्धेश्वर वाघुळदे, अनंता नेहेते, पिंटू तेली आदी मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे आयोजन बौद्ध पंच ट्रस्ट आणि जयंती उत्सव समितीच्या वतीने करण्यात आले होते. अध्यक्ष संतोष मनिराम मेढे यांच्या नेतृत्वाखाली आर. एल. आगळे सर, अशोक भालेराव, रोहित मेढे, धनराज मेढे, युवराज गाढे, भीमराव मेढे, विजय मेढे, चंद्रकुमार मेढे, पप्पू मेढे, सुमित साळुंके, अमोल मेढे, शुभम कोचुरे, लताबाई मेढे, वसुंधरा मेढे, पिंटू राणे, अभिजित मेढे, मयूर मेढे, गोलू मेढे यांच्यासह असंख्य समाजबांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.