जळगाव प्रतिनिधी । जळगाव शहरातील जुने जळगावातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर नगरातील सार्वजनीक मुतारी बाहेरुन अज्ञात चोरट्यांनी मोटारसायकल लंपास केल्याची घटना घडली. शनिपेठ पोलिसांत याप्रकरणी रात्री उशीरा अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, शहरातील कांचन नगर वाणी गल्लीतील रहिवासी हेमकांत उत्तम बाविस्कर (वय-४८) खासगी सुरक्षा रक्षक म्हणुन काम करतात. कामावर जाण्यासाठी त्यांच्याकडे (एमएच १९ ए एफ ८२१०) क्रमांकाची दुचाकी आहे. सोमवार २७ डिसेंबर रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास हे शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगरात असलेल्या मुतारीजवळ त्यांनी दुचाकी पार्क करून कामावर गेले. त्यानंतर अर्धातासानंतर आले आता त्यांना त्यांची दुचाकी आढळून आली नाही. परिसरात सर्वत्र दुचाकीचा शोध घेतला तरी देखील दुचाकीचा पत्ता लागला नाही. हेमकांत बाविस्कर यांनी शनीपेठ पोलीसात धाव घेवून दुचाकी चोरी झाल्याबद्दल तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून शनीपेठ पोलीस ठाण्यात सायंकाळी ७ वाजता अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक अमित बाविस्कर करीत आहे.