Home Cities एरंडोल दोन लाखांसाठी विवाहितेला मारहाण व जीवेठार मारण्याची धमकी

दोन लाखांसाठी विवाहितेला मारहाण व जीवेठार मारण्याची धमकी

0
59

एरंडोल – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील आडगाव येथील विवाहितेला माहेरहून घरखर्चासाठी २ लाख रुपये आणावे यासाठी मारहाण करून जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी कासोदा पोलीस ठाण्यात पतीसह पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

याबाबत माहिती अशी की, एरंडोल तालुक्यातील आडगाव येथील माहेर असलेल्या पूजा रोहित बारगळ (वय-२४) या तरुणीचा विवाह नाशिक येथील रोहित कृष्णा बारगळ याच्याशी रितीरिवाजानुसार झाला. लग्नाच्या सुरुवातीला काही दिवस चांगले गेले. त्यानंतर विवाहितेला माहेरहून २ लाख रुपये घरखर्चासाठी आणावे, अशी मागणी रोहित बारगळ याने केली. परंतु विवाहितेच्या आई-वडिलांची परिस्थिती हलाखीची असल्यामुळे पैश्यांची पूर्तता करू शकली नाही. त्यामुळे विवाहितेला शिवीगाळ करून मारहाण करण्यास सुरुवात केली. त्याचप्रमाणे ननंद, सासू आणि नंदोईभाऊ यांनी देखील पैशांसाठी तगादा लावला. या छळाला कंटाळून विवाहिता या आडगाव येथे माहेरी निघून आल्या. दरम्यान कासोदा पोलीस ठाण्यात धाव घेऊन त्यांनी तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून पती रोहित कृष्णा बारगळ, सासु ताराबाई कृष्णा बारगळ, नणंद मेघाराणी कृष्णा बारगड सर्व रा. विष्णुनगर, नाशिक, मोठी नणंद वर्षा रावसाहेब वनवे, नंदोईभाऊ रावसाहेब भीमराव वनवे रा. पाथर्डी-फाटा नाशिक या ५ जणांविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल युवराज कोळी करीत आहे.


Protected Content

Play sound