पिंपळगाव हरेश्वर येथे डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांची जयंती उत्साहात

पाचोरा प्रतिनिधी । पिंपळगाव हरेश्वर येथे भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांची जयंती नुकतीच जागतिक विद्यार्थी दिन म्हणून साजरी करण्यात आली.

१५ ऑक्टोबर १९३१ रोजी रामेश्वरम (तामिळनाडू) येथे जन्मलेले डॉ. ए. पी. जी. अब्दुल कलाम यांना मिसाईल मॅन म्हणूनही ओळखले जाते. डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांनी संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (डी.आर‌.डी.ओ.) आणि भारतीय अंतराळ संशोधन संस्था (आय. एस. आर. ओ.) मध्ये वैज्ञानिक आणि प्रशासक म्हणून काम केले. कलाम भारताचे ११ वे राष्ट्रपती भारताचे नागरी अवकाश आणि लष्करी क्षेपणास्त्र कार्यक्रम तयार होण्यापूर्वी त्यांनी विकसित करण्यासाठी अमूल्य योगदान दिले. एपीजे अब्दुल कलाम यांची जयंती जागतिक विद्यार्थी दिन म्हणून मूकबधिर निवासी विद्यालय पिंपळगाव (हरे.) विद्यालयात माजी मुख्याध्यापक विश्वनाथ चौधरी यांचे हस्ते साजरी करण्यात आली. सदर प्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक ईश्वर पाटील, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

 

Protected Content