डॉ.अशोक चौधरी राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । गोदावरी फाऊंडेशन संचलित कृषी विभागाचे शिक्षण व संशोधन संचालक डॉ.अशोक चौधरी यांना नुकताच राष्ट्रीय पातळीवरचा रेकॉर्ड ओनर प्रस्तृत मल्टीव्हर्स ओनर्स-२२ चा बेस्ट अ‍ॅकेडेमिशयन पुरस्कार प्राप्त झाला.

डॉ.अशोक चौधरी, शिक्षण व संशोधन, संचालक, कृषि विभाग यांना  रेकॉर्ड ओनर संस्थेतर्फे मिळालेले बेस्ट अ‍ॅकेडमेशियन २०२२ चे सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र गोदावरी फाऊंडेशनचे अध्यक्ष व माजी खासदार डॉ.उल्हास पाटील यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.

याप्रसंगी गोदावरी फाऊंडेशनच्या सदस्या डॉ.केतकी पाटील, डीएम कार्डियोलॉॅजिस्ट डॉ.वैभव पाटील, कृषी विभाग परिसर संचालक डॉ.एस.एम.पाटील, डॉ.एस.एस.राठी उपस्थीत होते. सर्वांनी डॉ.अशोक चौधरी यांचे अभिनंदन केले.

रेकॉर्ड ओनर या राष्ट्रीय संस्थेने डॉ.चौधरी यांनी कृषी, कृषी अभियांत्रिकी व अन्न तंत्रज्ञान विभागात दिलेल्या शैक्षणिक योगदानाची दखल घेऊन त्यांना सन्मानित केले.

 

Protected Content