पंतप्रधान मोदींच्या सभेसाठी जी. एम. फाउंडेशन येथे आढावा बैठक

WhatsApp Image 2019 10 10 at 8.51.06 PM

जळगाव, प्रतिनिधी | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची विराट जाहीर सभा १३ तारखेला सकाळी १० वाजता जळगाव येथील विमानतळाच्या समोरील पटांगणावर आयोजित करण्यात आली आहे. यासाठी ना. गिरीश महाजन, खासदार उन्मेष पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत जी. एम. फाउंडेशनच्या प्रांगणात आज गुरुवार सायंकाळी ७ वाजता आयोजित करण्यात आली होती.

पंतप्रधान मोदी यांची होणारी सभा युतीची असून भाजप शिवसेना व मित्र पक्षांच्या कार्यकर्त्यांनी कंबर कसून तयारी करायची आहे. लाखो खुर्च्यांची व्यवस्था असून एक लाख लोक बसतील एवढ्या क्षमतेचे पेंडोल टाकण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींना ऐकण्यासाठी लाखों जनता येणार असल्याने विशेष पासेस दिल्या जाणार आहे. मोठ्या जल्लोषात स्वागत आणि विजयाच्या संकल्प केला जाणार असल्याची माहिती पालकमंत्री गिरीश महाजन यांनी दिली. याप्रसंगी खासदार उन्मेष पाटील यांनी सांगितले की, ही सभा सर्वात विराट सभा व्हावी यासाठी आपण सर्वांनी मिळून प्रयत्न करावेत. ही सभा विराट अन् रेकॉर्ड ब्रेक ठरावी आणि यशस्वी व्हावी याकरिता कार्यकर्ते, शक्ती केंद्र प्रमुख, मंडळ अध्यक्ष, बूथ प्रमुख आजी माजी नगरसेवक पदाधिकारी, महिला आघाडीच्या पदाधिकारी सर्वांनीच मेहनत घ्यावी असे आवाहन खासदार पाटील यांनी केले. यावेळी जिल्हाध्यक्ष डॉ. संजीव पाटील. महापौर सीमा भोळे, आमदार स्मिता वाघ, आमदार राजूमामा भोळे, आमदार चंदुलाल पटेल, गटनेते भगत बालाणी, आदी मान्यवर उपस्थित होते. जिल्हा सरचिटणीस दिपकराव सूर्यवंशी यांनी सूत्रसंचालन तर प्रास्ताविक विशाल त्रिपाठी यांनी केले. आढावा बैठकीत मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले होते. या बैठकीला मनपा विरोधीपक्ष नेते सुनील महाजन, शिवसेना महानगर प्रमुख शरद तायडे, श्रीराम खटोड , प्रकाश पाटील, राजेंद्र घुगे पाटील आदि उपस्थित होते. प्रास्ताविक संघटन सरचिटणीस विशाल त्रिपाठी, यांनी केले. या बैठकीप्रसंगी भारतीय जनता पार्टीचे सर्व जिल्हा पदाधिकारी, मंडल अध्यक्ष व सरचिटणीस, मंडल पदाधिकारी विविध आघाड्यांचे अध्यक्ष , सरचिटणीस, महिला पदाधिकारी, महायुतीचे नगरसेवक, शक्तीकेंद्र प्रमुख, कायम निमंत्रित सदस्य व महायुतीचे असंख्य कार्यकर्ते मोठ्या संख्यने उपस्थित होते.

Protected Content