जळगाव प्रतिनिधी । भाऊंचा कट्टा कार्यक्रमात रविवार दि. २३ रोजी गांधी रिसर्च फाऊंडेशनचे अध्यक्ष तथा अणुउर्जा आयोगाचे माजी अध्यक्ष डॉ अनिल काकोडकर यांच्याशी नागरिकांना खुला संवाद साधता येणार आहे.
जळगाव येथील आंतर राष्ट्रीय ख्यातीच्या गांधी रिसर्च फाऊडेशन (जीआरएफ) चे अध्यक्ष तथा भारताच्या अणू ऊर्जा आयोगाचे माजी अध्यक्ष भारताचे टम मॅन पद्मविभूषण डॉ. अनिल काकोडकर यांच्याशी खुला संवाद करण्याची संधी जळगावकरांना उपलब्ध झाली आहे. रविवार (दि. २३ जून २०१९) रोजी सायंकाळी ५.३० वाजता जळगाव येथे जैन हिल्सवरील परिश्रम सभागृहात डॉ. काकोडकर यांच्याशी प्रश्नोत्तर स्वरुपात खुला संवाद होणार आहे. या संवादात भाऊंचा कट्टा या व्यासपिठाशी संबंधित नियमित सदस्य व इतर नागरिकांनी सहभागी होता येणार आहे. विज्ञान शाखांशी संबंधित तसेच स्पर्धा परिक्षेचा अभ्यास करणारे विद्यार्थी, युवक यांना या खुल्या संवादात उपस्थित राहता येईल. मात्र, ज्यांना उपस्थित राहायचे आहे, त्यांनी मोबाईल क्रमांक ९५५२५८५०८८ वर नाव एसएमएस करुन कळवायचे आहे. परिश्रम सभागृहात बैठक व्यवस्था मर्यादीत आहे.
भारताच्या अणू कार्यक्रमाला जन्म देणारे म्हणून पहिले संशोधक म्हणून स्व. डॉ. होमी जहांगिर भाभा यांचे नाव परिचित आहे. भारताचे मिसाईल मैन म्हणून माजी राष्ट्रपती स्व. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचा लौकिक आहे. भारताला सर्वार्थाने अण्वस्त्र सज्जतेचे कवच घालणारे अॅटम मैन म्हणून डॉ. काकोडकर यांना सन्मान मिळालेला आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन भारत सरकारने डॉ. काकोडकर यांना पद्मश्री, पद्मभूषण आणि पद्मविभूषण असे तीनही सन्मान प्रदान केले आहेत.
भारताला अणू उर्जा निर्मीतीमध्ये स्वयंपूर्ण बनविण्यामागे निवड शास्त्रज्ञांचे योगदान आहे. त्यांच्या यादीत डॉ. काकोडकर यांचा सर्वांत वरचा क्रमांक लागतो. भारताला जेव्हा अणू उर्जेची टंचाई होती केव्हा पासून तर आज अत्यंत विकसीत अणू उर्जा व क्षेपणास्त्रांच्या उपलब्धतेत डॉ. काकोडकर यांचे योगदान सुवर्ण अक्षरांनी लिहिले गेले आहे.
डॉ. काकोडकर सध्या भारतीय रिझर्व बँकेच्या केंद्रीय मंडळात संचालक असून भारतीय तंत्र परिषदेचे अध्यक्ष आहेत. या शिवाय ग्रामीण भागात पारंपरिक उर्जा स्त्रोत निर्मितीच्या कार्यात ते विविध प्रयोग व प्रसाराचे कार्य करीत आहेत. जळगाव स्थित जीआरएफचे दुसरे अध्यक्ष म्हणून त्यांनी पदभार स्वीकाररलेला आहे. माजी न्यायमूर्ती स्व. चंद्रशेखर धर्माधिकारी यांच्या नंतर ही जबाबदारी डॉ. काकोडकर यांनी स्वीकारली आहे. जीआरएफचे संस्थापक पद्मश्री डॉ. भवरलालजी जैन यांच्याशी स्व. धर्माधिकारी व डॉ. काकोडकर यांच्याशी आत्मियतापूर्ण स्नेह होता.