ना. गिरीश महाजन यांनी समन्वय समितीचे नेतेपद स्विकारल्याने शिक्षण विभाग संघटनेतर्फे अभिनंदनाचा ठराव

WhatsApp Image 2019 06 22 at 6.57.09 PM

यावल (प्रतिनिधी) शिक्षण विभाग संघटना समन्वय समितीची मिटींग “शिक्षक भवन, पुणे येथे पार पडली. जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन  यांनी शिक्षण विभाग संघटना समन्वय समितीचे नेतेपद स्विकारण्यास सहमती दाखविली म्हणून राज्य आदर्श शिक्षक समितीचे अध्यक्ष व समन्वय समितीचे समन्वयक किशोर पाटील कुंझरकर यांनी मांडलेला अभिनंदनाचा ठराव सर्वानुमते मंजूर करण्या आला. त्यास अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघटनेचे राज्य अध्यक्ष इल्हाजुद्दीन फारुकी व इतर यांनी अनुमोदन दिले.

बैठकीत शिक्षक , पदवीधर शिक्षक, मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख, महिला शिक्षक, ऊर्दू शिक्षक, साधन व्यक्ती व विषय शिक्षक अंशकालीन शिक्षक ,शिक्षण विस्तार अधिकारी , आदिवासी आश्रमशाळा शिक्षक यांच्या प्रश्नांवर चर्चा करण्यात आली. मंत्रालय पातळीवर ना. गिरीष महाजन यांच्या पुढाकारातून ना.विनोद तावडे , .ना.पंकजा मुंडे , अप्पर मुख्य शिक्षणसचिव, .ग्रामविकास विभाग प्रधान सचिव व समन्वय समिती पदाधिकारी यांची संयुक्त मिटींग मुंबई येथे जून २०१९ च्या शेवटच्या आठवड्यात होणार आहे.   समन्वय समितीचे राज्याध्यक्ष अर्जुनराव साळवे, महानगर नगरपालीका शिक्षक संघाचे राज्याध्यक्ष अर्जुनराव कोळी, अ.भा. ऊर्दू शिक्षक संघटनेचे राज्याध्यक्ष इल्हाजुद्दीन फारूखी समता शिक्षक संघाचे राज्याध्यक्ष अरूण जाधव, शिक्षक परिषदेचे राज्य कार्याध्यक्ष बाबूराव पवार , इब्टा संघटनेचे राज्याध्यक्ष उत्तरेश्वर मोहोळकर, केंद्रप्रमुख संघाचे राज्य कार्याध्यक्ष अशोकराव महाले, पदवीधर प्राथमिक शिक्षक महासंघाचे राज्य कार्याध्यक्ष गिरीष वाणी, सरचिटणीस महेश डोईफोडे, पदवीधर शिक्षक संघाचे राज्याध्यक्ष मुकेश शिंपले, महिला शिक्षक संघटनेच्या सुमती देखणे , मुख्याध्यापक सेवा संघाचे राज्याध्यक्ष अरूण आवारी यांनी विचार मांडले. मिटींगसाठी पुरोगामी शिक्षक समिती, मागासवर्गीय शिक्षक संघ, आदिवासी शिक्षक संघ , कास्ट्राईब महासंघ,राज्य ऊर्दू शिक्षक संघटना यांचे प्रतिनिधी उपस्थितीत होते.

Protected Content