सावदा – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण बकाले यांनी मराठा समाजाबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने मराठा समाज आक्रमक झाला आहे. किरणकुमार बकाले यांना केवळ निलंबितच नाही तर पोलीस सेवेतून बडतर्फ करून त्यांच्या मालमत्तेची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी सावदा ग्रामीण भागातील मराठा समाजाच्या वतीने उपविभागीय अधिकारी कैलास कडलक, फैजपूर यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, किरण बकाले या स्थानिक गुन्हा शाखा जळगाव विभागाचा पोलीस अधिकारी म्हणून एका उच्च पदावर कार्यरत असल्यावर देखील एका विशिष्ट समाजाविषयी बेजबाबदार भाषा वापरून पॉलिसी खाकीला डाग लावण्याचे काम केले आहे. याच्या काळात जिल्ह्यात मोठे अवैध धंदे बळकावले असून या निमित्ताने याने मोठी अवैध संपत्ती जमा केली असून बकाले याच्याकडे मोठया प्रमाणात अवैद्य संपत्ती आहे. त्यामुळे त्यामुळे अशा पोलीस निरीक्षकाला पदावर राहण्याचा कोणताही एक अधिकार नाही व आतापर्यंतच्या याचे सर्व कॉल रेकॉर्ड तपासून याने कोणकोणत्या समाजाविषयी असे घृणत्व भाषा वापरली आहे. याची देखील चौकशी करण्यात यावी, असे निवेदनात म्हटले आहे.
यावेळी प्रभाकर महाजन, कमलाकर पाटील, अनिल पाटील, मनोहर येवले, अमोल पाटील, रितेश मस्कावदे, बाळू पाटील, निलेश पाटील, विश्वेश्वर पाटील व अतुल पाटील, योगेश पाटील यांच्या निवेदनावर सह्या आहेत.