वेदांता-फॉक्सकॉनवरून राष्ट्रवादीचे आंदोलन

पुणे-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा वेदांता आणि फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला गेल्यामुळे राष्ट्रवादीने राज्य सरकारच्या विरोधात आंदोलन सुरू केले आहे.

वेदांता फॉक्सकॉन कंपनीचा प्रकल्प गुजरातला गेल्यामुळे शिंदे भाजप सरकार विरोधात आंदोलन सुरू करण्यात आले आहे. अशा गुंतवणुकी बाहेर गेल्या तर महाराष्ट्र प्रगती कशी करेल, माझी मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की राज्याच्या हितासाठी त्यांनी यावर सर्वपक्षीय बैठक बोलावून मार्ग काढावा कारण दोन ते तीन लाख रोजगाराचा हा प्रश्न असून याबाबत सरकारने गंभीर होणे गरजेचे आहे असं मत सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केलं आहे.

या प्रकल्पामध्ये १.५४ लाख कोटी रूपयांचा गुंतवणूक केली जाणार होती. त्याचबरोबर या प्रकल्पामुळे राज्यात जवळपास १ लाख नोकर्‍यांची निर्मिती झाली असती पण हा प्रकल्प हलवल्यामुळे महाराष्ट्र या फायद्याला मुकणार आहे.

Protected Content