अमळनेर प्रतिनिधी | तहसील कार्यालयाकडून निर्गमित केले जाणाऱ्या दाखल्यांचा कालावधी १५ ते ३० दिवसांचा असून सदर दाखले मुदतीच्या आत मिळण्यासाठी सेतू सुविधा केंद्रावर जास्तीची रक्कम देऊ नये असे अमळनेर उपविभागीय अधिकारी सीमा अहिरे यांनी नागरिकांना पत्रकाद्वारे आवाहन केले आहे
या पत्रकात, “अमळनेर तालुक्यातील नागरिकांना कळविण्यात येते की. सेतू सुविधा केंद्रामार्फत या कार्यालयाकडून किंवा तहसील कार्यालयाकडून निर्गमित केले जाणारे जातीचे, नॉन क्रिमिलियर आणि इतर दाखले यांचा १५ ते ३० दिवसांचा असून सदर दाखले मुदतीच्या आत मिळण्यासाठी नागरिक सेतू सुविधा केंद्रावर शासकीय फी व्यतिरिक्त दोनशे ते पाचशे रुपये जास्तीची रक्कम देत असल्याचं निदर्शनास आलं आहे
तरी याद्वारे नागरिकांना कळविण्यात येते की सेतू सुविधा केंद्रामार्फत या कार्यालयाकडून आणि तहसील कार्यालयाकडून निर्गमित केले जाणारे जातीचे तसेच नॉन क्रिमिलियर यासह इतर दाखले यांचा कालावधी १५ ते ३० दिवसांचा असून त्याकरिता सेतू सुविधा केंद्र चालकाकडून रीतसर पावती घेऊन शासनाच्या फी व्यतिरिक्त जास्तीचे पैसे नागरिकांनी सेतू सुविधा केंद्रावर देऊ नये.” अशा आशयाच्या निवेदनातून अमळनेर उपविभागीय अधिकारी सीमा अहिरे यांनी पत्रकाद्वारे नागरिकांना आवाहन केले आहे.