आजारी माणसाच्या भेटीला राजकीय रंग कशासाठी ?-पर्रीकर

नवी दिल्ली वृत्तसंस्था । राफेल प्रकरणी मनोहर पर्रीकर यांच्यावर टीका करणार्‍या राहूल गांधी यांना त्यांनी एका पत्राच्या माध्यमातून उत्तर देत आजारी माणसाच्या भेटीला राजकीय रंग न देण्याचे आवाहन केले आहे.

कालच राहूल गांधी यांनी मनोहर पर्रीकर यांची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली होती. या भेटीत अन्य कोणत्याही मुद्यावरून चर्चा झाली नसल्याची माहिती आधीच समोर आली होती. तथापि, राहूल गांधी यांनी मात्र आज एका व्हिडीओच्या माध्यमातून राफेल प्रकरणी मनोहर पर्रीकर यांचा विषय उपस्थित केला. यावर पर्रीकर यांनी एका पत्राच्या माध्यमातून राहूल गांधी यांना जोरदार प्रत्युत्तर दिले.

या पत्रात नमूद करण्यात आले आहे की, राहूल गांधी यांनी कोणतीही पूर्वसूचना न देता भेटीसाठी वेळ मागितली. राजकीय मतभेद विसरून आपण भेटायला आलात, याबद्दल मला समाधान वाटले. मात्र, राफेलबाबत आपल्यात चर्चा झाल्याचं वृत्त प्रसारमाध्यमातून समजलं. राफेल कराराच्या प्रक्रियेचा मी भाग नव्हतो, त्यामुळे मला त्याबाबत काही माहिती नाही, असं मी तुम्हाला सांगितलं होतं, असं पर्रिकरांनी आपल्या पत्रात स्पष्ट केलं आहे. सदिच्छा भेटीच्या नावाखाली राजकीय वातावरण दूषित करणे, यामागे आपला हेतू स्वच्छ दिसत नाही. घरी येण्यामागील आपला उद्देशही स्वच्छ नव्हता, असंच आता म्हणावं लागेल, अशा शब्दांत पर्रिकर यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

या पत्रात पुढे म्हटले आहे की, सध्या माझा जीवनाशी संघर्ष सुरू असल्याचं सर्वांनाच माहिती आहे. आपली भेट सकारात्मकता देईल, असं वाटलं होतं. मात्र, प्रत्यक्षात तसं घडलं नाही. अत्यंत खेदाने आपणास सांगावं लागत आहे की, आतातरी सत्य स्वीकारा, असं सांगत यापुढे आजारी माणसाची भेट घेऊन त्याला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न करू नका, असं आवाहन पर्रिकर यांनी पत्रात केलं आहे.

Add Comment

Protected Content