डोंगरकठोरा विकासो निवडणूक : निकाल जाहीर

यावल लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । यावल तालुक्यातील डोंगर कठोरा येथील विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत (सन २०२५-२०३०) नव्या व जुन्या उमेदवारांना मतदारांनी पसंती दर्शवली. ही निवडणूक काल, २३ मार्च रोजी अतिशय चुरशीने पार पडली.

सर्वसाधारण खातेदार कर्जदार प्रतिनिधी प्रवर्गातून आठ जागांसाठी ११ उमेदवार रिंगणात होते. तर अनुसूचित जाती जमाती प्रवर्गातून एका जागेसाठी तीन उमेदवारांमध्ये लढत झाली. अच्युत धनाजी चौधरी विद्यालय व ज्युनिअर कॉलेजमध्ये मतदानाची प्रक्रिया शांततेत पार पडली.

निवडणुकीत भिरुड अमोल सूर्यकांत (२७० मते), भिरुड चंद्रकांत जगन्नाथ (२७३ मते), भिरुड किरण दिनकर (२६७ मते), कोलते ललित सुधीर (२४७ मते), पाटील यदुनाथ प्रेमचंद (२३९ मते), राणे जगन्नाथ वासुदेव (२३५ मते), राणे प्रभाकर निळकंठ (२२२ मते) आणि झांबरे सुनील मुरलीधर (२८७ मते) हे सर्वसाधारण प्रवर्गातून विजयी झाले. अनुसूचित जाती जमाती प्रवर्गातून तडवी सुपडू महेबूब (१७३ मते) यांनी बाजी मारली.

याशिवाय, राणे कल्पना रवींद्र (महिला राखीव), भिरुड शोभा लक्ष्मण (महिला राखीव), झांबरे कृष्णा भास्कर (इतर मागासवर्गीय) आणि बाऊस्कर लिलाधर लहानू (वि.जा./भ.ज./वि.मा.प्र.) हे बिनविरोध निवडून आले आहेत. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून के. व्ही. पाटील आणि नंदकिशोर मोरे यांनी काम पाहिले. सहाय्यक निवडणूक अधिकारी म्हणून सचिव विजयसिंग पाटील, पोलीस पाटील राजरत्न आढाळे, सरपंच नवाज तडवी आणि ग्रामस्थांनी सहकार्य केले.

Protected Content