डोंगरकठोरा येथील अल्पवयीन मुलाचा निर्घृण खून

dongarkathora

डोंगरकठोरा प्रतिनिधी । यावल तालुक्यातील डोंगरकठोरा येथे सतरा वर्षीय अल्पवयीन तरूणाचा अज्ञातांनी दगडाने ठेचून व गळा चिरून निर्घृण खून केल्याची घटना आज सकाळी 8 वाजेच्या सुमारास उघडकीस आली. या घटनेमुळे परीसरात खळबळ उडाली आहे.

विश्वसनिय सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शरीफ मेहेरबान तडवी (वय-17) रा. तडवी वाडा, डोंगरकठोरा ता. यावल शेतमजूरीचे काम करतो. बुधवारी दिवसभर काम करून घरी आल्यानंतर रात्री 8.30 वाजता नमाज पठण करण्यासाठी घराबाहेर पडला होता. रात्री उशीरा घरी न आल्याने शरीफचे आई-वडीलांना शोधाशोध सुरू केली परंतू मिळून आला नाही. आज सकाळी गावाजवळील वड्री गावात जाण्यासाठीच्या रस्त्यावर शेतकरी शेतात जात असतांना काही मजूरांना शरीफचा मृतदेह आढळून आला. अज्ञात हल्लेखोरांनी दगडाने व गळा चिरडून खून केल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे.

घटनास्थळी यावल पोलीसांची धाव
गावातील सुज्ञ नागरीकांना यावल पोलीसांना घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच यावल पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. यावेळी पोलीस कर्मचारी घटनेचा पंचनाम करत आहे. दरम्यान अल्पवयीन तरूणाचा खून कोणत्या कारणामुळे झाला याचा उलगडा अजून झालेला नाही. याप्रकरणी अज्ञात हल्लेखोर यांच्या विरोधात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते.

Protected Content