डोंगर कठोरा येथून अल्पवयीन मुलीस पळवून नेल्याची तक्रार

mulis palavile

यावल प्रतिनिधी । तालुक्यातील डोंगर कोठारा येथील अल्पवयीन मुलीस कुणीतरी अज्ञात व्यक्तिने पळवुन नेल्याप्रकरणी यावल पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, डोंगर कठोरा तालुक्यातील बारावी वर्गात शिकणारी १७ वर्ष ६ महीने वय असलेली अल्पवयीन तरुणीला (दि. १९ जुन) रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास यावल येथे शाळेची एसटी प्रवास काढण्यास गेली असतांना ती उशीर झाला तरी घरी न परतल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. ती कुढे गेली असावी, तिला कोणी पळवून तर नाही ना..? असे अनेक प्रश्न उपस्थित होत असल्यामुळे अल्पवयीन तरुणीचे काकांनी आज (दि. 21 जुन) रोजी यावल पोलीस स्टेशनला फिर्याद नोंदवण्यात आली आहे. तरुणीस पळविणा-या व्यक्तीविरुध्द लवकरात लवकर गुन्हा दाखल करण्यात यावा. त्याचबरोबर चिंचोली तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीस गावातच राहणाऱ्या संशयीत संतोष धनासिंग रणसिंगे या तरूणाने पळवुन नेल्याची घटना (दि.२० जुन) रोजी घडली आहे. त्यामुलीला तिच्या राहत्या घरातुन पळवुन नेले होते. या संदर्भात त्या अल्पवयीन मुलीच्या पित्याने फिर्याद दाखल केली होती, चिंचोली येथुन पळवुन नेलेली मुलगी पातोंडा तालुका अमळनेर या ठीकाणी असल्याची माहीती मिळताच गावाकरांनी तिच्या शोध घेतल्यास ती आज (दि. 21 जुन) रोजी पातोंडा गावात आढळून आली आहे. त्या आरोपीस व मुलीला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

Protected Content