Home क्राईम डोहरीतांडा येथील विवाहितेची विष घेवून आत्महत्या

डोहरीतांडा येथील विवाहितेची विष घेवून आत्महत्या

0
116

Crime

जामनेर प्रतिनिधी । तालुक्यातील डोहरी तांडा येथील ४५ वर्षीय विवाहितेने गुरूवारी सकाळी विष घेवून आत्महत्या केल्याची घडना घडली. याबाबत पोलीसात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, प्रमिलाबाई किशोर तंवर (वय-45) रा. डोहरी तांडा ता. जामनेर या महिलेने घरात कोणीही नसतांना पिक फवारणीचे विषारी औषध घेवून आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली. याबाबत जामनेर पोलीसात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. मयताच्या पश्चात पती, दोन मुले असा परिवार आहे.


Protected Content

Play sound