रावेर प्रतिनिधी । शहरात आज अचानक औषध मेडीकल्सची तपासणी करून मेडिकल चालकांना डॉक्टरांच्या सल्ला व पावती शिवाय कोणत्याही व्यक्तीला ताप, सर्दी, खोकल्याचे औषध देऊ नका, अश्या स्पष्ट सूचना प्रभारी तहसीलदार संजय तायडे यांनी शहरातील सर्व मेडिकल चालकांना दिला आहे.
याबाबत वृत्त असे की, कोरोना संसर्ग आटोक्यात यावा तसेच कोरोना सदृष पेशंट यांनी परस्पर मेडिकल म्हणून सर्दी ताप व खोकल्याचे औषध दिले जात असल्याचे जिल्हा प्रशासना निदर्शनात आल्यानंतर आज रावेर शहरामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात असलेली संजवनी मेडिकल व श्रीगणेश मेडिकल यांची प्रभारी तहसीलदार संजय तायडे यांनी तपासणी केली व त्यांना सूचना केल्या की कोणत्याही कोरोना सदृष पेंशटला परस्पर औषधे देऊ नका.त्यांना डॉक्टरच्या पावती शिवाय कोणतेही औषध न देण्याचे स्पष्ट सूचना त्यांनी दिल्या आहे.यामुळे शहरातील मेकिडल चालकांमध्ये एकच खळबळ उडाली होती यावेळी त्यांच्या सोबत अव्वल कारकुन कौशल चौधरी लिपिक योगेश माहीते होते.