शतायु योग केंद्रात मोफत योग शिबीराचे आयोजन

जळगाव प्रतिनिधी । शहरातील मूळजी जेठा महाविद्यालयाच्या सोहम डिपार्टमेंट ऑफ योग अँड नॅचरोपॅथी विभागाच्या वतीने वाघ नगर येथील शतायु योग केंद्रात सात दिवसीय मोफत योग शिबीराचे आयोजन १५ फेब्रुवारीपासून करण्यात आले आहे.

जळगाव शहरातील केसीई सोसायटीच्या मुळजी जेठा महाविद्यालयाच्या सोहम डिपार्टमेंट ऑफ योग अँड नॅचरोपॅथी विभागाच्या वतीने शैक्षणिक भाग म्हणून असलेल्या सात दिवसीय नि:शुल्क योग शिबिराचे आयोजन वाघ नगर स्टॉप जवळील शतायु योग केंद्रात नि:शुल्क योग शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. योग शिबीर हे गुरूवार १५ फेब्रुवारी ते २३ फेब्रुवारी दरम्यान सकाळी ७ ते ८ आणि सायंकाळी ६ ते ८ या दोन वेळात घेण्यात येणार आहे. आयोजित योग शिबीरात सोहम डिपार्टमेंट ऑफ योग अँड नॅचरोपॅथी विभागाचे संचालक प्रा.डॉ. देवानंद सोनार यांच्या मार्गदर्शनाखाली योगशिक्षिका साधना ओंकार नारखेडे या महिलांना योगासनासह प्राणायाम यांचे मार्गदर्शन करून प्रात्यक्षिके घेतले जाणार आहे.

Protected Content