भरधाव ट्रकचा दुचाकीला कट : बालिका ठार

मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | भरधाव वेगाने जाणार्‍या ट्रकने दुचाकीला कर मारल्याने झालेल्या अपघातात चार वर्षाची बालिका ठार झाल्याची दु:खद घटना तालुक्यात घडली आहे.

या संदर्भातील वृत्त असे की, शहरापासून जाणार्‍या राष्ट्रीय महामार्गावर अपघात झाला. यात आरजे जीजे-८५०८ या क्रमांकाच्या ट्रकच्या ड्रायव्हरने भरधाव वेगाने आपल्या वाहनाने एमएच १९ डीझेड ९५५४ क्रमांकाच्या दुचाकीला कट मारला. यामुळे ही दुचाकी खाली पडली. यात यावरील वेदीका अमोल तायडे ( रा. नांद्रा हवेली, ता. जामनेर ) ही बालिका ट्रकच्या मागील चाकाखाली आली. यात तिचा मृत्यू झाला.

या अपघातात दुचाकीस्वार विजय भरत विसावे (रा. मांडवे, ता. जामनेर ) हा देखील गंभीर जखमी झाला असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या प्रकरणी ट्रक चालक गिरधारीलाल मेघवाल ( रा. राजस्थान) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक झालेली आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरिक्षक प्रदीप शेवाळे आणि पोना विनोद सोनवणे हे करीत आहेत.

Protected Content