अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | मंत्रीपदानंतर पहिल्यांदाच आपल्या शहरात दाखल होत असतांना ना. अनिल भाईदास पाटील यांनी शहराच्या वेशीवर माथा टेकवून भाळी माती लावत आपल्या कर्मभूमीप्रती कृतज्ञता व्यक्त केली.
आज मंत्री ना. अनिल भाईदास पाटील यांचे जळगाव रेल्वे स्थानकावर स्वागत झाले. तेथे ते अजिंठा विश्रामगृहात दाखल झाले. तेथून ते अमळनेरकडे रवाना झाले. या दरम्यान ठिकठिखाणी त्यांचे औक्षण करून आणि जोरदार आतषबाजीत स्वागत झाले. अमळनेर शहराच्या वेशीवर दाखल होताच त्यांनी ताफा थांबविण्याचे सांगितले. यानंतर कारमधून उतरून त्यांनी थेट भूमीवर माथा टेकवला. यानंतर त्यांनी आपल्या भूमिची माती कपाळाला लावली.
आमदार पाटील हे आपल्या मतदारसंघात भूमीपूत्र म्हणून ख्यात आहेत. याच मुद्यावरून निवडणूक लढवून त्यांनी विजय संपादन केला होता. यानंतर आज मंत्री बनून शहरात येत असतांना त्यांनी माथा टेकवत आपले भूमीपुत्रपदाला साजेशी कृती केल्याची कौतुकाची भावना सर्वत्र व्यक्त होत आहे.