
जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । दिवाळी हा प्रकाशाचा आणि आनंदाचा सण गरीब व गरजू नागरिकांच्या जीवनातही उजळला पाहिजे, या उदात्त हेतूने निःस्वार्थ जनसेवा प्रतिष्ठानतर्फे यंदाही एक स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला. प्रतिष्ठानने खेड्या-पाड्यावरील गरीब कुटुंबियांना दिवाळीनिमित्त फराळ, मिठाई आणि कपड्यांचे वाटप करून त्यांची दिवाळी गोड केली.
चोपडा तालुक्यातील मोहरद भागातील चांदण्या तलाव येथील तांडा वस्तीभागातील पाड्यामध्ये हा उपक्रम यशस्वीपणे पार पडला. या भागातील सुमारे १३० किलो फराळ, विविध प्रकारची मिठाई, साड्या आणि लहान मुलांसाठी कपड्यांचे वाटप करण्यात आले. प्रतिष्ठानच्या या प्रयत्नामुळे अनेक गरीब कुटुंबांच्या जीवनात हास्य आणि आनंदाची दिवाळी साजरी झाली.
या कार्यासाठी अनेक दानशूर व्यक्ती आणि संस्थांचे मोलाचे सहकार्य लाभले. जळगाव पोलीस दलातील प्रणेश ठाकूर, सुनील बाफना, माँ तारा फूडचे संचालक रोहित तलरेजा, रामकिशन वर्मा आणि हर्षदा पाटील यांनी विशेष मदत केली.
हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी निःस्वार्थ जनसेवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष अविनाश जावळे यांच्यासह धीरज जावळे, पूनम ताडे, बब्बू जावळे, शारदा सोनवणे, धनंजय सोनवणे, दिशा ताडे, विजया पांडे, देविदास महाजन आणि मोहित महाजन यांनी परिश्रम घेतले. प्रतिष्ठानचा हा उपक्रम समाजासाठी प्रेरणादायी ठरला आहे.



