जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर सह्याद्री रेल्वे मालधक्का माथाडी कामगार संघटनेतर्फे येथील माथाडी कामगार बंधुंना फराळ व मिठाई वाटप करून त्यांचा सत्कार करण्यात आला. कष्टकरी कामगारांच्या सन्मानाचा हा कार्यक्रम उत्साहाच्या वातावरणात पार पडला.
जळगाव येथील सह्याद्री रेल्वे मालधक्का येथे आयोजित या कार्यक्रमासाठी शिवसेना जिल्हा सहसंपर्कप्रमुख निलेश पाटील आणि शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सागर शिपी साहेब प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांच्या हस्ते कामगारांना दिवाळीचा फराळ आणि मिठाई वाटप करण्यात आले. यावेळी बोलताना प्रमुख पाहुण्यांनी माथाडी कामगारांच्या अथक परिश्रमाचे कौतुक केले आणि त्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनात संघटनेचे पदाधिकारी आणि सदस्यांनी सक्रिय सहभाग घेतला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संघटनेचे अध्यक्ष सागर सैंदाणे होते. तसेच उपाध्यक्ष राजू पटेल, सचिव पंडित पीरानाइक, सामाजिक कार्यकर्ते अमजद रंगरेज आणि धक्क्याचे सर्व हुंडेकरी लोक तसेच असंख्य कामगार बंधू मोठ्या संख्येने उपस्थित होते. संघटना दरवर्षीप्रमाणे यंदाही कामगारांच्या सुख-दुःखात सहभागी होत असते. हा दिवाळी सत्कार समारंभ याच सामाजिक बांधिलकीचे प्रतीक होता. कामगारांमध्ये आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाल्याचे यावेळी दिसून आले.



