पाचोरा – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | मौजे बांबरुड (महादेवाचे) येथे महाराष्ट्र वीज कामगार महासंघाच्या विभागीय कार्यकारिणीची विभागीय बैठक जळगाव परिमंडळ अध्यक्ष मुकेश अहिरे यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच झाली.
बैठकीत संघटना वाढीबाबत तसेच कर्मचारी यांच्या अडीअडचणी बाबत चर्चा करण्यात आली. संघटना आणि संघटनांचे कार्य याबाबतीत मुकेश आहिरे व कमलेश चौधरी यांनी आपले मनोगत व्यक्त केले. बैठकीस जळगाव सर्कल अध्यक्ष मुकेश अहिरे, सर्कल सहसचिव कमलेश चौधरी तसेच पाचोरा विभागाचे सर्व सदस्य उपस्थित होते. सूत्रसंचालन पाचोरा विभागाचे सचिव देवचंद गायकवाड यांनी तर उपस्थितांचे आभार संघटक रवि महाजन यांनी मानले.