जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पुण्यातील बालेवाडी येथील १६ ते २० नोव्हेंबर दरम्यान होणाऱ्या महाराष्ट्र राज्य आंतर जिल्हा व राज्य अजिंक्यपद स्पर्धेसाठी जळगांव जिल्ह्याचा संघ आज जाहीर करण्यात आला.
संघ पुढील प्रमाणे –
१४ वर्षं वयोगट मुली स्वरदा साने,धान्वी पाटील, आर्या बेहेडे, १४ वर्षं वयोगट मुले – भूमिज सावदेकर,जिनय पिपरिया, प्रेषित पाटील, ज्युनियर मुली – स्वरदा साने, धान्वी पाटील, आर्या बेहेडे, मैथिली थत्ते,
ज्युनियर मुले –
भूमिज सावदेकर,जिनय पिपरिया, प्रेषित पाटील, युवा मुली – स्वरदा साने, आर्या बेहेडे,धान्वी पाटील, मैथिली थत्ते, युवा मुले – भूमिज सावदेकर,जिनय पिपरिया, प्रेषित पाटील, संघ व्यवस्थापक स्वानंद साने व योगेश सावदेकर.
जिल्हा टेबल टेनिस असोसिएशनचे उपाध्यक्ष चंद्रशेखर त्रिपाठी यांनी संघ जाहीर केला. निवड समिती सदस्य म्हणून ऍड. विक्रम केसकर, शैलेश जाधव, अमित चौधरी व विजय विसपुते यांनी काम पाहिले. स्पर्धेसाठी खेळाडूंना असोसिएशनचे अध्यक्ष अशोक जैन, उपाध्यक्ष चंद्रशेखर त्रिपाठी, मनोज अडवाणी कार्याध्यक्ष प्रकाश चौबे, सचिव विवेक आळवणी, सहसचिव सुनील महाजन, राजु खेडकर, कोषाध्यक्ष संजय शहा,गिरीश कुलकर्णी व कार्यकारिणीने शुभेच्छा दिल्या आहेत.