जळगाव प्रतिनिधी । जिल्हा रूग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन.एस.चव्हाण यांच्या बदली नाशिक येथे करण्यात आली असून त्यांच्या जागी धरणगाव ग्रामीण रूग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. किरण पाटील यांची नियुक्ती करण्यात आली असल्याचे आदेश आज प्राप्त झाले आहे.
या संदर्भात अधिक माहिती अशी की, जिल्हा शासकीय रूग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन.एस.चव्हाण यांची नाशिक येथील रूग्णालयीन प्रशिक्षण केंद्र येथे वैद्यकीय अधिकारी म्हणून बदली करण्याचे आदेश सार्वजनिक आरोग्य विभागाने आज काढले आहे. प्रशासकीय कारणास्तव ही बदली करण्यात आल्याचे आदेशात नमूद केले आहे. त्यांच्या जागी धरणगाव ग्रामीण रूग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. किरण पाटील यांची नियुक्ती करण्यात आले आहे.