शालांत परीक्षेत जळगाव शहरातून प्रज्वल पाटील प्रथम

IMG 7948

जळगाव (प्रतिनिधी) महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत आलेल्या इयत्ता दहावीच्या परिक्षेचा निकाला आज शनिवार ८ जून रोजी जाहीर करण्यात आला असुन  शहरातील ब. गो. शानबाग विद्यालयातील शहरातून प्रज्वल प्रकाश पाटील या विद्यार्थ्यानेे ९६.४० टक्के गुण मिळवत पहिला तर याच शाळेतील सिद्धी विक्रांत पाटील हि ९६ टक्के मिळून दुसरा क्रमांक  पटकाविला आहे. प्रज्वल हा महापालिकेतील शाखा अभियंता प्रकाश पाटील यांचे चिरंजीव आहेत.

शाळांनुसार परिक्षेचा निकाल असा
का.उ. कोल्हे विद्यालय
शहरातील काशीबाई उखाजी कोल्हे विद्यालयाचा ८८.७२ टक्के निकाल लागला आहे. यात विद्यालयातून प्रथम जयश्री पाटील (९३.८०), द्वितीय अंकिता भंगाळे (९२.८०), तर तृतीय क्रमांक विद्या पाटील (८८.८०) टक्के मिळवत पटकाविला तर मागासवर्गीय विभागामधून गौरव बाबा (८०.६०) टक्के मिळवत प्रथम क्रमांक पटकाविला. गुणवंत विद्यार्थ्याचे मंडळाचे अध्यक्ष विजय कोल्हे, संस्थेचे संचालक ललित कोल्हे, चिटणीस अवधूत पाटील, उपचिटणीस सतीश खडके, मुख्याध्यापिका जे.आर. गोसावी यांनी अभिनंदन केले.

शेठ ला.ना सार्वजनिक
शेठ ला.ना सार्वजनिक विद्यालयाचा ८१.१३ टक्के निकाल लागला. यात प्रथम आदित्य पाटील (९३), द्वितीय भाग्येश सपकाळे (९२), प्रणवकुमार पंडित (९२), तर तृतीय क्रमांक राहूल लुले व रोहन वानखेडे या विद्यार्थ्यानी (९१.८०) टक्के मिळवत पटकावला. ४२४ विद्यार्थ्यापैकी १३८ विद्यार्थ्यानी प्रथम श्रेणी प्राप्त केली आहे. गुणवंत विद्यार्थ्याचे मंडळाचे कार्याध्यक्ष ॲड. सुशील अत्रे, सचिव अभिजित देशपांडे, प्रेमचंद ओसवाल, पारसमल कांकरिया, दिलीप मुथा, सतीश नाईक, प्रतिभा देशकर, मुख्याध्यापक दुर्गादास मोरे यांनी अभिनंदन केले.

गुळवे माध्यमिक विद्यालय
पुष्पावती खुशाल गुळवे मुलींचे माध्यमिक विद्यालयाचा ८१.८३ टक्के निकाल लागला. विद्यालयातून प्रथम गायत्री चौधरी (८५), द्वितीय पूर्वजा चौधरी (८२.८०) तर तृतीय क्रमांक विशाखा सोनवणे या विद्यार्थ्यानीने (८२.२०) टक्के मिळवत प्राप्त केला आहे. यशस्वी विद्यार्थीनींचे अध्यक्ष एस.डी. चौधरी, मुख्याध्यापक एच.आर. पाटील यांनी अभिनंदन केले.

ए.टी. झांबरे विद्यालय
केसीई सोसायटी संचलित ए.टी. झांबरे विद्यालयाचा ९७.१८ टक्के निकाल लागला. विद्यालयातून प्रथम पार्थ पिंपळकर (९४.६०), द्वितीय सेजल महाजन (९३.८०) तर तृतीय क्रमांक वेदांत वाकळे याने (९३) टक्के गुण मिळवत यश मिळविले आहे. विद्यालयातून १२ विद्यार्थ्यानी ९० टक्क्याहून अधिक गुण मिळविले आहे. गुणवंत विद्यार्थ्याचे संस्थेतर्फे अभिनंदन करण्यात आले.

मानवसेवा विद्यालय
मानव सेवा विद्यालयाचा ९३.१० टक्के निकाल लागला. विद्यालयातून प्रथम प्रतीक्षा भालेराव (८१.४०), द्वितीय आदित्य पाटील (८१) तर तृतीय क्रमांक गुंजन देसले याने (७९.४०) टक्के गुण मिळवत यश मिळविले आहे. गुणवंत विद्यार्थ्याचे संस्थेचे अध्यक्ष, पदाधिकारी सदस्य, माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका माया अंबटकर यांनी कौतुक केले.

इकरा शाहीन उर्दू हायस्कूल
इकरा शिक्षण संस्था संचालित इकरा शाहीन उर्दू हायस्कूलचा निकाल ७९.८७ टक्के लागला. यात विद्यालयातून शेख उसैद शेख गुलाब (९२.८०), द्वितीय तैयबा अनिस शाह (८७.४०) तर तृतीय क्रमांक अरिशा शेख या विद्यार्थीनीने (८४.६०) टक्के गुण मिळवून पटकाविला. गुणवंत विद्यार्थ्याचे संस्थेचे अध्यक्ष करीम सालार, सचिव गफ्फार मलिक, मुख्याध्यापक गुलाब शेख यांनी अभिनंदन केले.

न्यू इंग्लिश मिडीयम स्कूल
ईस्ट खानदेश एज्युकेशन सोसायटी संचालित न्यू इंग्लिश मिडीयम स्कूलचा ९१.६६ टक्के निकाल लागला. यात विद्यालयातून प्रथम कृष्णा बिर्ला (९३.४०), द्वितीय अजिंक्य कहाणे (९०.६०) तर तृतीय क्रमांक निखिल राणा याने (८७.६०) टक्के मिळवत यश मिळविले आहे. गुणवंत विद्यार्थ्याचे संचालक मंडळातर्फे अभिनंदन करण्यात आले.

Add Comment

Protected Content