जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या वतीने घेण्यात येणऱ्या आंतर जिल्हा मुलांच्या क्रिकेट स्पर्धेसाठी जळगाव जिल्हा मुलांचा संघ निवडण्यासाठी निवड चाचणीचे आयोजन सोमवार २२ एप्रिल रोजी सकाळी ८. ३० वाजता जैन स्पोर्ट्स अकॅडमीच्या मैदानावर (विद्या इंग्लिश शाळेच्या मागे) आयोजित करण्यात आले आहे.
जा मुलांची जन्म तारीख ०१.०९.२००१ वा त्या नंतरची असेल तेच मुले या निवड चाचणीसाठी पात्र असतील सर्व इच्छुक मुलांनी या निवड चाचणीत जास्तीत जास्त संख्येने आपला सहभाग या लिंक https://forms.gle/XePt2NkHhTEXCKrM9 वर जाऊन गुगल फॉर्म व ऑनलाईन निवड चाचणी फी ₹ १००/- भरून आपला सहभाग नोंदवावा व सोबत आपले आधार कार्ड व जन्म दाखला अपलोड करावा तसेच निवड चाचणी साठी क्रिकेट साहित्य पांढरा गणवेश व शूज सोबत आणावे. असे जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशन चे अध्यक्ष अतुल जैन यांनी केली आहे. अधिक माहितीसाठी सचिव अरविंद देशपांडे ( ९४०४९५५२०५ ) व सहसचिव अविनाश लाठी (९८२२६१६५०३ ) यांचेशी संपर्क साधावा असे कळविण्यात आले आहे.