राज्यस्तरीय वेट लिफ्टींग स्पर्धेत जिल्ह्यातील खेळाडूंची चमकदार कामगिरी

wate lifting

रावेर, प्रतिनिधी | ७२ वी पुरुष आणि ३५ वी महिला राज्यस्तरीय सिनियर वेट लिफ्टींग स्पर्धा नुकतीच २९ ते ३१ डिसेंबर दरम्यान अमरावती येथे पार पडल्या. या स्पर्धेत जळगाव जिल्हा वेट लिफ्टींग संघटनेच्या खालील खेळाडूंनी चमकदार कामगिरी करत ओव्हर ऑल व आंतर जिल्हा अश्या दोन्ही प्रकारात सांघिक विजेते पद पटकावले आहे.

 

राज्य पातळीवर सन २०१६ पासून ते आजतागायत सलग १२ वेळा विजेते अन उपविजेतेपद पटकावण्याचा भीमपराक्रम या संघटनेने केला आहे.
विजयी खेळाडूंची नावे अशी आहेत. १) उदय महाजन तृतीय क्रमांक, २) गोविंदा महाजन चतुर्थ क्रमांक, ३) भोलेनाथ चौधरी चतुर्थ क्रमांक, ४) गौरव महाजन पाचवा क्रमांक, ५) दुर्गेश महाजन तृतीय क्रमांक, ६) पंकज महाजन तृतीय क्रमांक, ७) मनिष महाजन दुसरा क्रमांक, ८) तेजस रणशिंग चत्रूर्थ क्रमांक, ९) निशिकांत पाटील तृतीय क्रमांक.

विजयी खेळाडूंचे या यशाबद्दल जिल्हा वेट लिफ्टींग संघटनेचे अध्यक्ष प्रदीप मिसर, संजय मिसर्, प्रकाश बेलासकर, राजेश शिंदे, आमोद महाजन, नाना महाजन, यशवंत महाजन, व्ही. एस. नाईक, महाविद्यालयाचे प्राचार्य पी.व्ही. दलाल, उमेश पाटील, आधुनिक व्यायाम शाळा रावेरचे अधक्ष संदीप महाजन, लखन महाजन, भूषण महाजन, अविनाश पाटील, नितीन महाजन यांनी अभिनंदन केले आहे. हे सर्व खेळाडू प्रशिक्षक योगेश महाजन यांच्या मार्गदर्शना खाली सराव करतात.

Protected Content