रावेरात विद्यार्थ्यांनी केले नवीन वर्षाचे स्वागत ‘वर्ग सजावटीने’

raver

 

रावेर प्रतिनिधी । येथील माउली फॉउंडेशन संचलित अदित्य इंग्लिश मिडीयम स्कुल व संत ज्ञानेश्वर प्राथमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी नविन वर्षाचे स्वागत हे वर्ग सजावटीने केले आहे. तसेच विद्यार्थ्यांनी आगळावेगळा वर्ग सजावटीचा उपक्रम साजरा केला.

यावेळी आदित्य इंग्लिश मिडीयम स्कुलचे विद्यार्थ्यांनी इ. नर्सरी ते इ.8 वी व संत ज्ञानेश्वर प्राथमिक विद्यालयातील इ.1ली ते इ.6वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी विविध प्रकारचे वस्तुंनी, तसेच ‘बेटी बचाव बेटी पढाव’चे बॅनर, पताके, बलून, नंबर चार्ट, सुर्यग्रहण तसेच सर्व महापुरुषांचे फोटो लावून आणि विविध प्रकारचे साहित्यांनी विदयार्थांनी वर्ग सजावट केली आहे.

त्यावेळी अदित्य इंग्लिश मिडीयम स्कुलचे मुख्याध्यापक संजय पाटील व श्री. संत ज्ञानेश्वर प्राथमिक विदयालयाच्या मुख्याध्यापिका मनिषा सोहनी यांनी शाळेतील प्रत्येक वर्गामध्ये जाऊन मुलांनी केलेले वलास डेकोरेशन बघुन त्यांना अजुन टाकाऊ पासुन टिकाऊ वस्तु तयार करून वर्ग सजावट करुन प्रथम क्रमांक घेऊ शकतो, असे सांगून विदयार्थांना मार्गदर्शन केले. तसेच सर्व विदयार्थांनी खुप छान प्रकारे वर्ग सजावट करुन सर्वांना नविन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या. कार्यक्रम यशस्विरित्या पार पाडण्यासाठी शाळेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी यांनी परिश्रम घेतले.

Protected Content