पाचोरा – नंदू शेलकर | गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या उपविभागीय अधिकारी यांच्या नुतन निवासस्थानाचे उद्घाटन आज शनिवार दि. ८ आॅक्टोबर रोजी आ. किशोर पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
उपविभागीय अधिकारी यांच्या नुतन निवासस्थानाचे उद्घाटन आ. किशोर पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी उपविभागीय अधिकारी डॉ. विक्रम बांदल, मा. नगराध्यक्ष संजय गोहील, सार्वजनिक बांधकाम विभागाने उप अभियंता दिपक पाटील, कनिष्ठ अभियंता श्रीनिवास काजवे, सहाय्यक अभियंता जी. एस. भगुरे, विज वितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता रामचंद्र चव्हाण, पुरवठा विभागाचे अव्वल कारकून अभिजीत येवले, मयुर आगरकर, उपविभागीय अधिकारी कार्यालयाचे आर. एस. मोरे, सेनेचे तालुकाप्रमुख सुनिल पाटील, शहर प्रमुख किशोर बारावकर, मुकुंद बिल्दीकर, गणेश पाटील, अनिल धना पाटील, पंढरीनाथ पाटील, प्रविण ब्राह्मणे, प्रविण पाटील, एकनाथ पाटील, स्वीय्य सहाय्यक राजेश पाटील, शिव पाटील सह विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
तात्कालिक उपविभागीय अधिकारी राजेंद्र कचरे (पाटील) यांच्या कार्यकाळात मंजुर झालेल्या उपविभागीय अधिकारी यांच्या नुतन निवासस्थानाचा प्रश्न आ. किशोर पाटील यांच्या पाठपुराव्याने मार्गी लागला आहे. सुमारे ५९ लाख रुपये मंजूर झाले होते. याप्रसंगी आ. किशोर पाटील यांनी नुतन वास्तुचे भरभरून कौतुक करत तहसिलदार यांचे निवासस्थान, पोलिस निरीक्षक यांचे निवासस्थान, तसेच पोलिस कर्मचाऱ्यांना नुतन निवासस्थान मंजूर करण्यासाठी सर्वोतपरी प्रयत्न सुरू असुन या निवासस्थानासाठी लवकरात लवकर कशी मंजुरी मिळवता येईल यासाठी मी प्रयत्नशील असल्याचे आ. पाटील यांनी यावेळी ग्वाही दिली.
तसेच उपविभागीय अधिकारी डॉ. विक्रम बांदल यांनी आ. किशोर पाटील व तात्कालिक उपविभागीय अधिकारी राजेंद्र कचरे (पाटील) यांचे निवासस्थान पुर्णत्वास नेल्याबद्दल आभार व्यक्त केले. प्रास्ताविक प्रविण ब्राम्हणे, सुत्रसंचलन अभिजीत येवले तर आभार प्रविण पाटील यांनी मानले.