चोपडा प्रतिनिधी । तालुक्यातील सत्रासेन येथील धनाजी नाना आदिवासी सेवा मंडळ संचलित डी.आर.बी. अनुदानीत आश्रम शाळेच्या प्रांगणात प्रकल्प जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धांचे उद्घाटन आज करण्यात आले आहे.
यावल येथील प्रकल्प अधिकारी विनिता सोनवणे यांच्याहस्ते दिपप्रज्वलन करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर धनाजी नाना आदिवासी सेवा मंडळाचे अध्यक्ष रविंद्र भादले, ऊपाध्यक्ष धनंजय भादले, सचीव नानेश्वर भादले यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. दरम्यान आदिवासी प्रकल्प अधिकारी विनिता सोनवणे यांचा सत्कार संस्थेचे अध्यक्ष रविंद्र भादले यांच्याहस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक जगदिश महाजन यांनी केले. जळगाव जिल्ह्यातील सुमारे 65 आदिवासी आश्रम शाळेच्या खेळाडूंनी सहभाग घेतला आहे. दरम्यान, ही स्पर्धा तीन दिवस चालणार असून समारोप दिवशी संस्थेचे अध्यक्ष रविंद्र भादले यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात येणार आहे. कार्यक्रम यशस्वीतेसाठी विनोद पाटील, पवार सर, महाजन सर, पन्नालाल जोशी हे प्रयत्न करत आहेत.