जिल्हाधिकारी कार्यालयात ७ जुलै रोजी जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी आयोजित करण्यात येणारा जिल्हास्तरीय लोकशाही दिन या महिन्यात सोमवार, ७ जुलै रोजी होणार आहे. सकाळी १०.३० वाजता अल्पबचत सभागृह, जळगाव येथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी गजेंद्र पाटोळे यांनी दिली आहे.

या लोकशाही दिनात संबंधित तक्रारदार स्वतः उपस्थित राहून आपले अर्ज सादर करणार असल्याने, सर्व संबंधित विभागांच्या विभागप्रमुखांनाही उपस्थित राहणे अनिवार्य करण्यात आले आहे.

नागरिकांना त्यांच्या विविध तक्रारी घेऊन या लोकशाही दिनाला उपस्थित राहण्याचे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी गजेंद्र पाटोळे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे. या संधीचा लाभ घेऊन नागरिकांनी आपल्या समस्या मांडून त्यांचे निराकरण करून घ्यावे, असे प्रशासनाने म्हटले आहे.