यावल प्रतिनिधी | यावल तालुक्यातील मारूळ येथे एकता क्रिकेट क्लबतर्फे आयोजित १५ दिवसांपासून सुरु असलेल्या क्रिकेट टूर्नामेंटचा अंतिम सामना व बक्षीस वितरण सोहळा नुकताच संपंन्न झाला.
या क्रिकेट स्पर्धेत जिल्ह्यतून ५० संघ सहभागी झाले होते. या संघांमध्ये फैजपूर, भुसावळ, रावेर भडगाव, यावल, हिंगोणा, सावदा, आमोदा, नहावी, तळेगाव, जळगाव, येथील खेळाडूंनी सहभाग घेतला. या टूर्नामेंटचे आयोजन मारूळ येथील मोर नदीच्या शेजारी रोडलगत असलेल्या मैदानावर करण्यात आले होते.
पंधरा दिवस चाललेल्या या क्रिकेट स्पर्धेचा अंतिम सामना रविवारी झाला. यात मारूळच्या उमर कलब व इलेव्हन क्लब यांच्यात अंतिम लढत होऊन उमर कलब संघाने फलंदाजी, गोलंदाजी व क्षेत्ररक्षण या सर्व क्षेत्रात उत्कृष्ठ व दमदार कामगिरी करीत विजय मिळविला.
या वेळी उमर कलब विजय संघाला यावल रावेरचे विधानसभा क्षेत्राचे आमदार शिरीष मधुकरराव चौधरी यांच्यातर्फे प्रथम क्रमांकाचे ८००० हजार रोख पारितोषिक तर उप-विजेता संघास इलेव्हन क्लब संघाला मारूळ ग्रामपंचायत चे सरपंच सय्यद असद अहमद जावेद अली यांच्या हस्ते चार हजार रोख देऊन सन्मान करण्यात आला .
यावेळी स्पर्धच्या अंतिम सामन्याप्रसंगी धनंजय चौधरी, पत्रकार हसरत अली सय्यद, इखलास सय्यद, मोहब्बत अली सय्यद, मुतीउर रहमान पिरजादे, प्रविन हटकर, सैफुर रहमान सय्यद, अनस सय्यद, उमर सय्यद, जाबीर तडवी, रज्जाक तडवी, इसहाक तडवी, फरीद तडवी कैसर भाई, तनझिल सय्यद, इखलास सय्यद, ताबिश सय्यद, इंजमाम सय्यद, इक्बाल हसन, हसीब सय्यद, वसीम सय्यद, सआद सय्यद, अनस सय्यद, अबुजर सय्यद, फते अली सय्यद, हजरत अली सय्यद, झोहेब सय्यद, अकबर अली सय्यद, मोहम्मद अवेस, सकलेन सय्यद यांचे सह सर्व सहकारी आणि स्पर्धचे आयोजक उपस्थित होते.