सिध्देश लाडने सोडली मुंबईची साथ

Siddhesh Lad left

 

मुंबई वृत्तसंस्था । आयपीएलच्या आगामी हंगामाच्या पार्श्वभूमीवर मुंबई इंडियन्स संघातील फलंदाज सिद्धेश लाड याने मुंबईची साथ सोडत कोलकाता संघात प्रवेश केला आहे. यासंदर्भात अधिकृत माहिती आयपीएलने संकेतस्थळावर दिली आहे.

store advt

आयपीएलच्या आगामी हंगामासाठी मुंबई इंडियन्सने आपल्या संघातील फलंदाज सिद्धेश लाड कोलकात्याच्या संघात दिला आहे. बीसीसीआयने परवानगी दिल्यानंतर मुंबई आणि कोलकाता या दोन संघांमध्ये हा व्यवहार पार पडला आहे. २०१५ साली सिद्धेश लाड मुंबईच्या संघात आला होता, मात्र इतक्या वर्षांमध्ये २०१९ सालातील एका सामन्याचा अपवाद वगळता सिद्धेशला एकही सामना खेळायला मिळाला नाही. आयपीएलने आपल्या अधिकृत संकेतस्थळावर याबद्दल माहिती दिलेली आहे.

error: Content is protected !!