Home Cities जळगाव जिल्हाधिकाऱ्यांची विभागीय रेल्वे व्यवस्थापकांशी चर्चा

जिल्हाधिकाऱ्यांची विभागीय रेल्वे व्यवस्थापकांशी चर्चा

0
187

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी भुसावळ विभागीय रेल्वे व्यवस्थापक पुनीत अग्रवाल यांची प्रत्यक्ष भेट घेऊन रेल्वे प्रशासन व जिल्हा प्रशासन यांच्यातील परस्पर समन्वय अधिक बळकट करण्याच्या दृष्टीने विविध प्रशासकीय विषयांवर सविस्तर चर्चा केली.

या बैठकीत नाशिक–त्र्यंबकेश्वर येथील आगामी सिंहस्थ कुंभमेळा अनुषंगाने जिल्हा प्रशासन व रेल्वे प्रशासन यांच्या संयुक्त समन्वयातून करावयाच्या आवश्यक पूर्वतयारी व कार्यवाहीबाबत विचारविनिमय करण्यात आला. कुंभमेळ्याच्या कालावधीत प्रवासी सुविधा, वाहतूक नियोजन व सुरक्षिततेसाठी आवश्यक उपाययोजनांवर चर्चा झाली.

तसेच जिल्ह्यात सुरू असलेल्या विविध रेल्वे लाईन प्रकल्पांसाठी भूसंपादन प्रक्रियेतील अडचणी, सक्षम प्राधिकारी (भूसंपादन) यांना भेडसावणाऱ्या समस्यांचे निराकरण तसेच भूसंपादनाची कार्यवाही अधिक गतीमान करण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

याशिवाय इतर प्रशासकीय व समन्वय विषयक बाबींवरही सकारात्मक चर्चा झाली. या बैठकीद्वारे रेल्वे व जिल्हा प्रशासनामधील समन्वय अधिक दृढ ठेवून प्रकल्पांची वेळेत व सुस्थितीत अंमलबजावणी सुनिश्चित करण्याबाबत सकारात्मक भूमिका निश्चित करण्यात आली. जिल्हा प्रशासन, जळगाव सार्वजनिक सुविधा व पायाभूत विकासाच्या कामांसाठी रेल्वे प्रशासनासोबत सातत्यपूर्ण समन्वय राखत कार्यरत असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.


Protected Content

Play sound