फैजपूर प्रतिनिधी | फैजपूर नगर पालिकेच्या वतीने दिव्यांग बांधवांना कल्याणकारी निधीचे वाटप करण्यात आले.
मंगळवार, दि. ४ जानेवारी रोजी नगर पालिकेचे लेखा परिक्षक मंगलसिंग वतपाल यांच्या हस्ते फैजपूर दिव्यांग सेना शहराध्यक्ष नितीन महाजन, तालुकाध्यक्ष योगेश चौधरी, उपाध्यक्ष ललित वाघूळदे, तालुका सचिव चेतन तळेले यांना प्रतिनिनिक स्वरूपात चेकचे वितरण करण्यात आले.
सन २०२१ च्या मंजूर यादीप्रमाणे संबंधित दिव्यांग बांधवांच्या बँक खात्यात रक्कम वर्ग करण्यात आली आहे. यावेळी नगरपरिषदेच्या अंतर्गत दिव्यांग बचत गट स्थापन करण्यात येणार आहेत. बचत गटाबाबत सहाय्यक प्रकल्प अधिकारी प्रविण सपकाळे यांनी दिव्यांग बांधवांना मार्गदर्शन केले. “माझी वसुंधरा अभियान”अंतर्गत सर्व दिव्यांग बांधवांनी शपथ घेतली.
यावेळी लेखापरिक्षक मंगलसिंग वतपाल, लेखापाल निलेश दराडे, सहाय्यक प्रकल्प अधिकारी प्रविण सपकाळे, महीला समुदाय संघटक विद्या सरोदे, दिव्यांग सेना पदाधिकारी नितीन महाजन, योगेश चौधरी, चेतन तळेले, ललित वाघुळदे, अंकुर भारंबे, कुणाल वाघुळदे, युनुस तडवी, लोणार सरोवर दिव्यांग संघटनेचे तालुकाध्यक्ष शे.अहसान शे.ईसा, रोहित तायडे, रोहित भारंबे, संजय वानखेडे, विनोद बि-हाडे, भिमराव मेढे, सुहासिनी चौधरी, अरुण सोनवणे, अशोक पाटील, अमिनाबी तांबट आणि शहरातील दिव्यांग बांधव उपस्थित होते.