जळगाव प्रतिनिधी । शहरातील का.ऊ. कोल्हे विद्यालयातील खडके प्राथमिक शाळेत पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांना तांदूळ, मसूर दाळ, मटकी, हरभरेसह पोषण आहाराचे वाटप करण्यात आले.
यावेळी पालकांना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्सिंग, मास्क व सॅनिटायझर लावून शालेय पोषण आहाराचे वाटप करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांना तांदूळ मसूर डाळ, मटकी, हरभरे, मुगडाळ आदी धान्य देण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांच्या पालकांना आफलाईन व ऑनलाईन व्हॉटस्ॲप गृपच्या माध्यमातून देण्यात येणाऱ्या अभ्यासासंबंधीत पालकांशी संवाद साधला. यावेळी काही पालकांना येणाऱ्या अडचणी शिक्षकांनी समजावून घेतले. तसेच पालकांना कोरोनाविषयी स्वत: आणि आपल्या कुटुंबियांची काळजी कशी घ्यावी याचे मार्गदर्शन केले. यावेळी मुख्याध्यापिका आशालता वाणी यांच्यासह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आदींची उपस्थिती होती.