खूनाच्या गुन्ह्यात साक्ष दिल्याच्या रागातून दाम्पत्याला बेदम मारहाण

जळगाव प्रतिनिधी । खूनाच्या गुन्ह्यात साक्ष दिल्याच्या रागातून राजीव गांधी नगरातील दाम्पत्याला मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात तीन जणांविरोधात गुन्हा केला आहे.

 

रमेश बाबासाहेब झेंडे (वय-४६) रा. राजीव गांधी नगर जळगाव असे जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. रमेश झेंडे हे भिक्षुक असून आपल्या पत्नी संगिता यांच्यासह वास्तव्याला आहे. रमेश झेंडे यांनी एका खुनाच्या गुन्ह्यात साक्ष दिल्याच्या कारणावरून मंगळवारी ४ जानेवारी रोजी सायंकाळी ४ वाजेच्या सुमारास घरी असतांना  हग्गु जीवन जुन्नी, सागर जीवन जुन्नी आणि बळी जीवन जुन्नी तिघे रा. राजीव गांधी नगर यांनी रमेश झेंड व त्यांची पत्नी संगिता यांना शिवीगाळ व मारहाण केली. यातील एकान रमेश झेंडे यांना दगडाने डोक्यावर व पाठीवर मारहाण करत जीवेठार मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी बुधवारी ५ जानेवारी रात्री रामानंदनगर पोलीसात तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक रेवानंद साळुंखे करीत आहे.

Protected Content