खेड येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप

यावल प्रतिनिधी । तालुक्यातील सावखेडा सिम येथील रहिवासी व आदिवासी कुटुंबातील सामाजिक कार्यात अग्रेसर असलेले खतीब तडवी यांनी देशाच्या ७३ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त २६ जानेवारी रोजी पुणे जिल्ह्यातील खोपेवाडी तालुका खेड येथील जिल्हा परिषदेच्या मराठी मुलांच्या शाळेत शालेय साहित्याचे वाटप केले.

यावल तालुक्यातील सावखेडा सिम येथील मुळ रहिवासी व सद्या मुंबई महानगरपालिकेचे मुख्य लिपिक म्हणुन कार्यरत असलेले खतीब हुसेन तडवी यांचेमार्फत जिल्हा परिषदच्या मराठी शाळेतील आदिवासी विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाप्रसंगी शाळेचे शिक्षक आदी पारधी तसेच अमित सरांनी विद्यार्थ्यांना नियमांचे पालन करून प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात व त्याचे महत्त्व पटवून दिले.

खतीब तडवी यांनी सामाजीक बांधिलकीच्या माध्यमातुन विद्यार्थ्यांना केलेले हे शालेय साहित्य वितरीत केल्याबद्दल त्यांचा खोपेवाडीच्या ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला व त्यांचे आभार मानण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आदी पारधी यांनी केले.  खतीब  हुसेन तडवी यांचे मूळ गाव सावखेडा सिम तालुका यावल जि. जळगाव येथील रहिवासी असून ते मुंबई महानगरपालिकेत मुख्य लिपिक म्हणून कार्यरत असतांना ते आपल्या माध्यमातुन सामाजिक कर्तव्य म्हणुन ते अनेक वेळा अशा विविध समाजोपयोगी उपक्रमांना धावून जातात.

 

Protected Content